
परागचे आजोबा झोपाळ्यावर बसून आकाशवाणीवर जुनी हिंदी गाणी ऐकत होते, आणि पराग कॉम्प्युटरवर गेम खेळण्यात मग्न होता. तेवढ्यात किशोरकुमारचे ‘कोई लौटा दे मेरे बिते हुए दिन...’ हे गाणे लागले, आणि ते मनातून थोडे खट्टू झाले. न राहवून त्यांना सतत वाटत होते ही आजकालची पिढी फक्त मोबाईल गेम्स्, कॉम्प्युटरवर गेम्स् ह्यांनाच जास्त महत्व देते. मैदानी खेळ हे आजच्या धकाधकीच्या जीवनातूनमुळी हद्द्पारच झाले आहेत. आणि त्यामुळेच मुलांमध्ये डिप्रेशन, न्यूनगंड आणि एकटेपणा...