Posted by Vinayak H. Katwankar. Posted on 5:50 PM | 4 comments

एकादशी आणि पंढरीची वारी

आषाढी-कार्तिकी भक्तजन येती । पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती । चोखा म्हणे नाम घेता भक्त होती दंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग पांडुरंग एकादशी जस-जशी जवळ येते तस-तशी संत चोखामेळा ह्यांच्या अभंगातील ह्या ओव्या नकळतच मुखी येतात. एका वर्षात जवळपास २४ एकादशी येतात, पण अधिक मास असणार्‍या वर्षात २६ एकादशी येतात. वैदिक हिंदु धर्मात एकादशीला अनन्यसाधारण महत्व आहे; आणि ‘आषाढी’ आणि ‘कार्तिकी’ एकादशी म्हणजे वारकर्‍यांसाठी जणू आनंदाची पर्वणीच......