परागचे आजोबा झोपाळ्यावर बसून आकाशवाणीवर जुनी हिंदी गाणी ऐकत होते, आणि पराग कॉम्प्युटरवर गेम खेळण्यात मग्न होता. तेवढ्यात किशोरकुमारचे ‘कोई लौटा दे मेरे बिते हुए दिन...’ हे गाणे लागले, आणि ते मनातून थोडे खट्टू झाले. न राहवून त्यांना सतत वाटत होते ही आजकालची पिढी फक्त मोबाईल गेम्स्, कॉम्प्युटरवर गेम्स् ह्यांनाच जास्त महत्व देते. मैदानी खेळ हे आजच्या धकाधकीच्या जीवनातूनमुळी हद्द्पारच झाले आहेत. आणि त्यामुळेच मुलांमध्ये डिप्रेशन, न्यूनगंड आणि एकटेपणा येतो, आणि ह्या एकटेपणामुळे संघिक काम करणे जमत नाही. मैदानी खेळ खेळल्याने चित्त प्रसन्न होते, शरीर सुढ्रुढ होते, आत्मविश्वास आणि जो आनंद मिळतो त्याने मनाला नवीन काम करण्याची शक्ती आपोआप मिळते.
|
लगोरी |
अनेक पालक आपल्या मुलांना ज्या खेळातून अधिक पैसा आणि प्रसिद्धी मिळते असे खेळ खेळण्यास प्रोत्साहीत करतात, आणि ह्यामुळे प्राचीन खेळांकडे दुर्लक्ष होत चालले आहे. आपले प्राचीन भारतीय खेळ (उदा. लंगडी, खो-खो, आट्यापाट्या, बटाटा शर्यत, सुरपारंब्या, लगोरी, विटीदांडू) असे आहेत की ते खेळल्याने आनंद तर मिळतोच परंतु सांघिक भावना, चटकन निर्णय घेण्याची ‘निर्णय क्षमता’, चपळता, निरीक्षणशक्ती देखील वाढते. असे एक ना अनेक फायदे ह्या खेळांचे आहेत. दररोज खेळणे खुपच छान पण आठवड्यातून एकदा खेळल्यामुळे देखील संपुर्ण आठवडा काम करण्यासाठी लागणारी ‘ऊर्जा’ आपल्याला मिळतेच. कठीण काळातून बाहेर येण्यासाठी, निखळ आनंद आणि मजेसाठी खेळासारखे दुसरे औषध नावाला शोधून देखील सापडणार नाही. प्रत्येकाला एखादा खेळ कसा खेळावा हे बघून देखील सहजपणे समजू शकते आणि त्यामुळेच खेळाला भाषेचे, सीमेचे, वयाचे कुठलेही बंधन उरत नाही.
|
बटाटा शर्यत |
परमपूज्य बापूंनी म्हणजेच ‘डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी’ ह्यांनी रामराज्याच्या प्रवचनात ‘अनिरुद्धाज् इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स् ऍन्ड बोन्साय् स्पोर्ट्स्’ ची स्थापना केली आहे. परमपूज्य बापू स्वतः ह्याचे मुख्य (डीन) आहेत. आपल्या पैकी अनेकांना हे माहीत असेल नसेल, बापू स्वतः उत्तम पोहतात, उत्तम क्रिकेट, बॅडमिंटन, कबड्डी खेळतात, मल्लखांब आणि भारतीय प्राच्चविद्येवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहेच. अश्या आपल्या लाडक्या बापूंनी आपल्या सर्वांसाठी हे ‘बिते हुए दिन’ परत आणले आहेत. ह्या इन्स्टिट्यूट अंतर्गत सध्या पाच पुरुषार्थ मंडलम् कलश अंतर्गत ठराविक उपासना केद्रांवर हे खेळ खेळले जातात, आणि ‘श्रीहरिगुरुग्राम’ येथे सध्या प्रशिक्षक शिबीर चालू आहे. परमपूज्य बापूंच्या आशिर्वादाने सर्व उपासना केद्रांवर हळुहळु हे खेळ सुरु होतील. आपण देखील सध्या ह्या पाच पुरुषार्थ मंडलम् कलश अंतर्गत येणार्या उपासना केद्रांवर जाऊन खेळू शकतो तसेच जर आपल्याला प्रशिक्षक म्हणून सेवा करण्याची इच्छा असेल तरी देखील आपण ‘विनामुल्य’ ह्या इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेऊ शकतो. कोणतीही फी अथवा देणगी मुल्य इथे आकारले जात नाही. मला स्वतःला खेळल्याने खुप आनंद व आठवडाभर काम करण्यासाठी लागणारी ऊर्जा तर मिळते. त्यामुळे निखळ आनंद देणार्या ह्या इन्स्टिट्यूटमध्ये आपणही आनंदाने सहभागी होऊ शकतो. काय मग येणार ना ह्या इन्स्टिट्यूटमध्ये ?