आज
निर्सगाचा नूर काही औरच होता.
डोळे
किलकिले करुन बाहेर बघतो तर
मस्तपैकी मुसळधार पाऊस कोसळत
होता आणि मला अंगावर चादर ओढून
झोपून त्याची मजा लूटण्याचा
मोह अनावर झाला होता.
ऐवढ्यात
आईची हाक आली,
अरे
विनू उठ सात वाजले...
थोडा
वेळ तसाच लोळत राहीलो.
माझ्या
बाबांचा रोज सकाळी झोपेतून
जाग आली की सकाळचे नित्यक्रम
करताना सकाळी सकाळी रेडीओ
(आकाशवाणी)
लावण्याचा
नेहमीचा शिरस्ता.
तेव्हा आकाशवाणीवरच्या त्या जुन्या
हिंदी गाण्याचे शब्द माझ्या कानांवर पडताच आळस आणि मनावर आलेली
मरगळ लगेच नाहीशी झाली.
सावन का महिना, पवन करे सोर
जियारा
रे झूमें ऐसे जैसे बनमां नाचे
मोर
खरचं
ह्या श्रावण महिन्याची जादू
काही वेगळीच आहे.
जेव्हा
वरुण राजा सकल सृष्टीवर आपल्या
जलधारांची मुक्त हस्ते उधळण
करित असतो,
वसुंधरेला
पुन्हा एकदा हिरवीगार आणि
सुपिक बनवित असतो;
तेव्हा
वरुण राजाच्या सोबत हातात
हात गुंफीत सगळ्यांना भरभरुन
आनंद देण्यासाठी ‘श्रावण’
महिना जणू आतुरच झालेला असतो.
पाऊस
ऐन बहरत असताना श्रावण महिन्याचे
आगमन होते.
ह्या
काळात निसर्ग आपल्याला त्याच्या
वेगवेगळ्या छटा दाखवित असतो
आणि त्याचे अनामिक सौंदर्य
मनावर भुरळ पाडत असते,
जणू
देवलोकीचा स्वर्गच जमिनीवर
उतरलेला असतो.
श्रावणात
घन निळा बरसला,
रिमझिम
रेशिमधारा
उलघडला
झाडांतून अवचित,
हिरवा
मोरपिसारा
श्रावण
महीना म्हणजे ‘सणांचा राजा’
असं म्हटल्यास वावगं ठरणार
नाही.
हिंदू
संस्कृतीतील अनेक सण श्रावण
महिन्यांत येतात.
आध्यात्मिक
प्रगती,
पवित्र
व्रत आणि उपासनेसाठी हा सणांचा
राजा असलेल्या श्रावण महिन्याचा
वरचा क्रमांक आहे.
सुर्याचा
सिंह राशीत प्रवेश होत असताना
श्रावण महिन्याची सुरुवात
होते.
पुराणांमध्ये
संदर्भ सापडतो की,
ह्या
श्रावण महिन्याच्या काळात
जेव्हा देव आणि दानव ह्यांच्यात
समुद्रमंथन झाले.
ह्या
समुद्रमंथनाच्या वेळी ‘अमृत’
आणि ‘हलाहल’ (विष)
तयार
झाले.
त्यातील
‘अमृत’ हे समस्त देवांनी
प्राशन केले तर ‘हलाहल’ हे
‘परमशिव’ ह्यांनी प्राशन
केले.
हलाहल
प्राशन करताच परमशिव ह्यांचा
कंठ निळा दिसू लागला,
म्हणून
परमशिवाला ‘निळकंठ’ असे
नामाभिदान प्राप्त झाले.
ह्या
हलाहलचा प्रभाव कमी करण्यासाठी
महादेवाने आपल्या मस्तकावर
चंद्रकोर धारण केली आणि ‘गंगा’
मातेला धारण केले.
त्यामुळे
हलाहलाचा प्रभाव कमी झाला.
श्रावण
महिन्यातील प्रत्येक दिवस
हा शुभ आणि पवित्र मानला जातो
कारण श्रावणातील प्रत्येक
दिवसला त्याचे त्याचे विशेष
महत्व आहे.
सोमवार
-
शिवपूजन
मंगळवार
-
मंगळागौरी
पूजन
बुधवार
-
बुधपूजन
गुरुवार
-
बृहस्पती
पूजन
शुक्रवार
-
जरा-जिवंतिका
पूजन
शनिवार
-
अश्वत्थमारुती
पूजन
रविवार
-
आदित्यपूजन
श्रावण
महिन्यातील सोमवार हा ‘श्रावणी
सोमवार’ म्हणून ओळखला जातो.
‘श्रावणी
सोमवारी’ महादेवाच्या पिंडीवर
दूध,
जल
आणि विविध धान्यांचा
अभिषेक करुन ‘शिव
पूजन’ केले जाते.
अनेक
जण सोमवरी उपवास करतात तसेच,
सोळा
श्रावणी सोमवारांचे व्रत
देखील करतात.
श्रावणातील
मंगळवारी माता पार्वतीचे
स्मरण करुन ‘मंगळागौरी
पूजन’ केले जाते.
प्रामुख्याने
स्त्रीयांचा ह्या पूजनात
सहभाग असतो.
फुगड्या
घालत व फेर धरुन नाचत आईच्या
प्रतिमेसमोर स्त्रीया
मंगळागौरीचे विविध खेळ खेळतात
आणि मंगळागौरीची रात्र जागवितात.
नव-विवाहीत
युवतींसाठी मंगळागौरी पूजन
म्हणजे जणू आनंद आणि उत्साहाची
पर्वणीच असते.
ह्या
दिवशी पंचपक्वानांचा बेत
देखील आखला जातो.
श्रावणातील
बुधवारी ‘बुध पूजन’
करण्यात येते,
तर
व्याधींमधून मुक्त होण्यासाठी
आणि शैक्षणिक प्रगतीसाठी
श्रावणातील गुरुवारी ‘बृहस्पती
पूजन’ करण्यात
येते.
श्रावण
महिन्यातील शुक्रवारी विवाहित
जोडपी माता जिवंतिकेला
संतानप्राप्तीसाठी व रक्षणासाठी
साकडे घालतात व ‘जिवंतिका
पूजन’ करतात.
स्कंद
पुराणांत माता ‘जिवंतिका’
आणि ‘जरा-जिवंतिका’
पूजनाचा महीमा वर्णिला आहे.
ज्याच्या
बलापुढे मांदार पर्वतही
अणूच्या कणाएवढा आहे अश्या
महारुद्र हनुमंताचे ‘मारुती
पूजन’ श्रावणातील
शनिवारी करण्यात येते,
तर
सुर्य नारायणाचे ‘आदित्यपूजन’
श्रावणातील रविवारी करण्यात
येते.
श्रावण
हा जास्तीत जास्त श्रवणभक्ती
करण्याचा महिना आहे.
श्रवणभक्ती
म्हणजे शुभ,
पवित्र
ऐकणे (स्तोत्र,
मंत्र)
आणि
मनांत सतत स्मरण करुन तोंडाने
त्यांचा उच्चार करणे.
श्रावणात
अधिकाधिक श्रावणभक्ती करणे
श्रेयस्कर असते.
परमेश्वर
आपल्याला ह्या श्रवणभक्तीचे
विपुल प्रमाणात फल फळ देतोच.
परमपूज्य
सद्गुरु अनिरुद्ध बापूंच्या
आशिर्वादाने आणि सद्गुरु
श्रीअनिरुद्ध उपासना ट्रस्टच्या
विद्यमाने दरवर्षी अखंड
श्रावणमांस “श्री घोरकष्टोद्धरण
स्तोत्राचे पठण” करण्यात
येते.
आपण
देखील ह्या स्तोत्र पठणात
सहभागी होऊन शुभ स्पंदने मिळवू
शकतो आणि आपली आध्यात्मिक
प्रगती करु शकतो.
घोरकष्टोध्दरण स्तोत्राचे पठण, बुधवार दिनांक ३ ऑगस्ट २०१६ ते गुरुवार दिनांक १ सप्टेंबर २०१६ पर्यंत होणार आहे.
पत्ता:
श्रीकृष्ण हॉल, जाधव मार्ग, ऑफ एस्.एस्. वाघ मार्ग,
चित्रा सिनेमा समोर, गुरुद्वारा जवळ, नायगाव,
दादर (पूर्व), मुंबई - ४०० ०१४.
वेळ:
गुरुवार सोडुन इतर दिवशी,
सकाळी ९:३० ते दुपारी १:०० वाजेपर्यंत व
संध्याकाळी ५:३० ते रात्रौ ९:००
गुरुवारी, सकाळी ९:३० ते दुपारी १:०० वाजेपर्यंत व
दुपारी ४:०० ते संध्याकाळी ७:०० वाजेपर्यंत
संदर्भ: इंटरनेट
पत्ता:
श्रीकृष्ण हॉल, जाधव मार्ग, ऑफ एस्.एस्. वाघ मार्ग,
चित्रा सिनेमा समोर, गुरुद्वारा जवळ, नायगाव,
दादर (पूर्व), मुंबई - ४०० ०१४.
वेळ:
गुरुवार सोडुन इतर दिवशी,
सकाळी ९:३० ते दुपारी १:०० वाजेपर्यंत व
संध्याकाळी ५:३० ते रात्रौ ९:००
गुरुवारी, सकाळी ९:३० ते दुपारी १:०० वाजेपर्यंत व
दुपारी ४:०० ते संध्याकाळी ७:०० वाजेपर्यंत
संदर्भ: इंटरनेट
Very informative article. Thanks for sharing information on mangalagauri/budhpoojan/jara-jivantikapoojan.
ReplyDelete