तो येतोय पुन्हा, आपल्या भेटीला...!! पण तो म्हणजे नक्की कोण ?
अहो बनेश... बनेश (फास्टर) फेणे. चित्रपटाचे प्रोमोज् आणि ट्रेलर्स पाहून
खूपचं छान वाटल. कारण लहानपणी कथा-कादंबऱ्यांतून वाचलेला/अनुभवलेला हा
काल्पनिक सुपरहिरो मूर्त रुप घेऊन चित्रपटाच्या माध्यमातून येत्या
शुक्रवारी म्हणजे २७ ऑक्टोबर २०१७ ला आपल्या समोर येतोय.
फास्टर फेणे म्हणजे भा. रा. भागवतांच्या
कादंबऱ्यांमधील एक काल्पनिक पात्र. चुणचुणीत, हुशार, चपळ आणि अचाट
बुद्धिमत्ता असलेला हा फेणे नावाप्रमाणेच fast आहे. त्याची detective गिरी
सतत सुरुच असते. फेणेच्या अनेक कथा वाचनात आल्या आहेत. त्याचे भीमपराक्रम
वाचताना जणू ते पात्र सजीव होऊन जातं. हे प्रताप - हे पराक्रम जणू आपल्या
समोर घडत आहेत, किंबहूना आपणच फास्टर फेणे आहोत असं वाटत राहतं. 'आपल्या सोबत असं घडलं तर किती मज्जा येईल' असं वाटणं हा त्या लेखकाचा खरा जय आहे.
या पुस्तकासंदर्भात खूप साऱ्या आठवणी आहेत त्यातील एक म्हणजे, माझ्या आजीच्या घराजवळ एक library आहे. लहानपणी मी, माझा मोठा भाऊ आणि मित्रमंडळी तिथे पुस्तकं वाचायला जायचो. तेंव्हा तिथे एका निबंध स्पर्धेत 'तुमच्या आवडीचे पुस्तक' यावर निबंध लिहायचा होता. आणि मी फास्टर फेणे या पुस्तकावर निबंध लिहिलेला आणि मला बक्षिस सुद्धा मिळाल होतं.
टॉक... आवाज काढून गुन्हेगारांच्या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या फास्टर फेणेचा नवा पराक्रम पाहायलाच हवा... नाही का ?
टॉक... आवाज काढून गुन्हेगारांच्या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या फास्टर फेणेचा नवा पराक्रम पाहायलाच हवा... नाही का ?
0 comments:
Post a Comment