काही दिवसांपूर्वी आम्ही शाळेतील वर्गमित्र बर्याच वर्षांनी भेटलो. निमित्त होते ‘वर्गमित्रांची reunion meeting’. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर निघताना सर्वजण म्हणाले, "अरे आपण एवढ्या वर्षांनी भेटलो आहोत, एक फोटो तो बनता है." तेव्हा आमच्यातला एक जण म्हणाला, "आपण ‘सेल्फी’ घेऊया, म्हणजे सगळे जण एका फोटोमध्ये येऊ कोणीही फोटोत miss नाही होणार". त्या मित्राने त्याच्या स्मार्टफोनने झक्कासपैकी ‘सेल्फी’ काढला. त्या जुन्या सुखद आठवणी सोबत घेऊन आम्ही आपापल्या घरी गेलो. पण माझ्या डोक्यातून काही ह्या ‘सेल्फी’ चा विचार जात नव्हता.
त्याला कारणही तसेच आहे, आजकाल ‘सेल्फी’ काढताना खुप अपघात होतात. अश्या अपघातांच्या अनेक बातम्या आपण न्युज आणि वर्तमानपत्रातून ऐकत, वाचत असतो. अशी बातमी मनाला चटका लावून जाते. हल्लीच्या तरुणाईला ह्या ‘सेल्फीच्या’ नादाने अक्षरशः वेडावून सोडले आहे. अतिउत्साहापायी, काहीतरी वेगळं करुन फोटो काढण्याच्या नादापायी किंवा अन्य बर्याच कारणामुळे अनेक जण आपल्या मौल्यवान जीवास देखील मुकत आहेत. अगदी प्रत्येकाला आपला फोटो काढायला हे आवडतचं. आपण स्वतः देखील त्या फोटोचा भाग असावं अस पण वाटतं, परंतु जर ‘सेल्फी’ वा फोटो काढताना आपली काळजी घेतली तर अश्या अपघातांपासून आपण नक्कीच वाचू शकतो.
१. ‘सेल्फी’ वा फोटो काढताना नेहमी सभान राहीले पाहीजे. भान हरपून कधीही ‘सेल्फी’ काढू नये.
२. आजूबाजूच्या परिस्थितीचा अंदाज घेऊन मगच ‘सेल्फी’ वा फोटो काढावा.
३. स्वतःवर नियंत्रण ठेवावे, अतिउत्साहात काहीतरी वेगळं करायला जाऊन फोटो वा ‘सेल्फी’ काढू नये.
४. जिथे फोटो काढायला सक्त मनाई आहे तिथे कधीही फोटो काढू नये.
५. आपल्यावर किंवा इतरांवर आलेल्या संकटाच्यावेळी किंवा एखाद्या आपत्तीच्या वेळी ‘सेल्फी’ न काढता प्रथम आपला जीव वाचवावा, तसेच इतरांना मदत करावी.
६. ‘सेल्फी’ वा फोटो काढताना पावित्र्याचा भंग होईल असे कोणताही फोटो काढू नये.
७. एखाद्या महत्वाच्या गोष्टीचा फोटो घेताना तिथल्या व्यक्तींची पूर्व परवानगी घ्यावी मगच फोटो काढावा.
त्यादिवशी एक जाहीरात बघितली, एक व्यक्ती साधारण बाराव्या मजल्यावरुन पडत आहे आणि दहाव्या मजल्या वरील व्यक्ती त्याच्या गॅलरीत उभा राहून त्याच्या मदतीला न जाता पडतानाचा फोटो काढत आहे. दरम्यानं ती फोटो काढाणारी व्यक्ती फोटो काढण्यासाठी मागे-मागे जात असताना पाय सरकून थेट खाली पडणार आहे, तेव्हा त्या व्यक्तीला वाचवायला कोणीही नाही. तेव्हा आपण देखील जागरुक राहून आपली काळजी घेऊया व संकटात इतरांना मदत करुन आपले कर्तव्य नीट बजावूया. मला देखील फोटोग्राफीची खुप आवड आहे, पण वरील गोष्टींची काळजी मी घेत असतो. देवाने आपल्याला जे आयुष्य दिले आहे हे खूप अनमोल आहे, ‘सेल्फीच्या’ नादापायी आपण ते फुकट घालवता कामा नये. तेव्हा "Please don't loose self while taking selfie"

0 comments:
Post a Comment