हिवाळा संपत आला तसा मुंबईत थंडीने आपले रंग दाखवायला सुरवात केली आहे. मुंबईत तशी फारशी थंडी पडत नाही. पण यंदा मात्र मुंबईत पारा बराच खाली उतरला कारण, मुंबईत गेल्या ४४ वर्षातील सर्वात जास्त थंडी अनुभवायला आली. सकाळी-सकाळी तोंडातून वाफ निघायला लागली की थंडी भरात येते. त्यामुळे अनेकांनी कपाटात ठेवलेले स्वेटर्स् व मफलर्स् देखिल बाहेर काढावे आहेत.हल्ली तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर जॅकेट्स् घालताना दिसतो. त्याने थंडी पासून बचावही होतो व फॅशनची हौस देखिल भागते. अनेक जण रात्री शेकोटीची उब घेऊन आपली थंडी पळवत आहेत.
भारताबरोबरच, चीन मध्ये देखिल यंदा थंडीने कहर केला. उत्तरप्रदेशात 0 अंश सेल्सिअस तापमान दाखविणार्या पार्याने जवळ-जवळ २६ लोक दगावले तर चीन मध्ये तीन दशकातील नीचांक गाठला. -३.८ अंश सेल्सिअस तापमानामुळे समुद्राचे पाणी गोठून त्यात जवळपास १००० जहाजे अडकली. चीनच्या ईशान्य भागात तर पारा -१५.३ अंश सेल्सिअस पर्यंत खाली गेला आहे.
दत्तजयंतीला सुरु होणार्या ‘श्री वर्धमान व्रताधिराज’ मध्ये परमपूज्य अनिरुद्ध बापूंनी आपल्या सर्वांना जी अंगे सांगितली आहेत त्यातील काही अंगे अश्या थंडीवर मात करण्यासाठी खूप उपायोगी पडतील.
१. सकाळी आंघोळीपूर्वी हाताला व पायाला तिळाच्या तेलाने मालिश करणे व नंतर कोमट पाण्यने आंघोळ करणे.
२. तिळ व तत्सम स्निग्ध पदार्थांचे ह्या दिवसात जास्त सेवन करणे, यामुळे शरिरातील ऊर्जा वाढण्यास मदत होते.
३. कडधान्ये व डाळींचे ह्या दिवसात कमी सेवन करणे, यामुळे शरिराची रुक्षता कमी होते.
परमपूज्य बापूंचा सखोल वैद्यकिय अभ्यास व ज्ञानामुळे आपल्याला हे उपाय सहजरित्या कळू शकतात.
होय विनायक सिंह, खरच, खूपच थंडी अनुभवायला मिळत आहे. समुद्र गोठविणारी थंडी आजपर्यंत पाहिली नव्हती !! शेवटी तुम्ही लिहिलेल्या ’श्री वर्धमान व्रताधिराज’ मधील उपाय हे नक्कीच उपयोगाचे आहेत!
ReplyDelete