Posted by Vinayak H. Katwankar. Posted on 9:16 PM | No comments

इको - फ्रेंडली गणपती

इको - फ्रेंडली गणपती
     हा पर्यावरणाशी निगडीत एक स्तुत्य उपक्रम आहे, ज्यात कागदाच्या लगद्यापासून गणपतीच्या सुंदर मुर्ती बनविल्या जातात. भक्तांनी ‘अनिरुद्धाज्‌ युनिव्हर्सल बॅंक ऑफ रामनाम’ मध्ये जमा केलेल्या रामनाम वह्यांच्या कागदाच्या लगद्यापासून ह्या मुर्ती बनविल्या जातात. पाण्यात आगदी सहजपणे विरघळल्या जाणार्‍या ह्या मुर्तींना रंगविण्यासाठी नैसर्गिक रंगांचा वापर केला जातो. प्लास्टर ऑफ पॅरिस, रासायनिक रंगांचा यात अजिबात वापर केला जात नाही.

     सन २००७ सालापासून ‘श्री अनिरुद्ध उपासना फाऊंडेशन’ आणि ‘अनिरुद्धाज्‌ युनिव्हर्सल बॅंक ऑफ रामनाम’ मधील स्वयंसेवक ह्या मुर्ती बनवित आहेत. ‘श्री अनिरुद्ध उपासना फाऊंडेशन’ आणि ‘अनिरुद्धाज्‌ युनिव्हर्सल बॅंक ऑफ रामनाम’ चा यंदा साधारण ३५०० मुर्ती बनविण्याचा मानस आहे.





0 comments:

Post a Comment